मनमिळाऊ स्वभावाच्या आबांनी कधीही कुणाचं मन दुखावलं नाही – अजित पवार

सांगली : सामाजिक प्रश्नांची जाण ठेवणारं सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्त्व, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते दिवंगत आर. आर. (आबा) पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज, अंजनीत त्यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलं आणि आदरांजली वाहिली. त्यांच्या कार्याला, विचारांना वंदन केलं. मनमिळाऊ स्वभावाच्या आबांनी कधीही कुणाचं मन दुखावलं नाही. राजकारणात राहून समाजसेवेत त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. अशा भावना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त अओल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Loading...

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर.आर.पाटील यांचं वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झालं होत. पण आर. आर. पाटील हे सर्वार्थाने ‘अंजनी’चे सूत होते. गरीब शेतकर्याच्या घरात जन्मलेल्या रावसाहेब रामराव पाटील यांनी शालेय दशेतच वक्तृत्वस्पर्धा गाजवायला सुरुवात केली. कॉलेजमध्ये आल्यावर हे वक्तृत्वच त्यांच्या चरिर्थाचं साधन बनलं. आपला मुद्दा ठासून मांडण्याचे कसब असलेले आबा. निवडणुकीदरम्यान, नेत्यांसाठी चक्क भाषणं ठोकत फिरायचे. सांगलीकरही आबांची भाषणबाजी डोक्यावर घ्यायचे. याच काळात आबांना राजकारणाची गोडी लागली. आपल्या भाषणांच्या जोरावर उमेदवार निवडून येत असेल तर मग आपण का निवडणूक लढवू नये, असा प्रश्न आबांना पडला नसता तरच नवलच. मग काय आबांनीही वकिलीचे शिक्षण घेत असतानाच राजकारणाच्या आखाड्यात उडी घेतली. याच काळात आबा त्यांच्या खुमासदार भाषणांमुळे शरद पवारांच्या नजरेत भरले.

दस्तुरखुद्द पवारांचीच साथ मिळाल्याने आबांनीही तिथून पुढे कधी मागे वळून पाहिलं नाही. पण राजकारणात पुढे जाऊनही आबा तासगावकरांना कधीच विसरले नाहीत. अगदी आबा मंत्रिपदी असतानाही त्यांच्या मुली जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकत होत्या. झेडपी सदस्य ते राज्याचा उपमुख्यमंत्री हा टप्पा आबांनी मोठ्या झपाट्याने पार केला. आणि प्रत्येक पायरीवर आपल्या कामाचा ठसा उमटवला. आता ग्रामविकास खात्याचच घ्या ना. आधी हे खातं फारसं चर्चेतही नसायचं.

पण आबांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवून खात्याला एक आगळी वेगळी ओळख निर्माण करून पुढे गृहखात्यात बढती मिळाल्यानंतरही त्यांनी महात्मा गांधी तंटामुक्त योजना राबवून उभ्या महाराष्ट्रातले हजारो तंटे चुटकीसरशी मिटवले. नक्षलग्रस्त गडचिरोलीचंही पालकत्व स्वीकारून आदिवासींच्या नेमक्या समस्या जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. एवढंच नाही, तर आदिवासी मुलांना दत्तक घेऊन इंग्रजी शाळेत घातलं आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. गृहमंत्री असताना सावकारांच्या विरोधातली ‘ती कोपरापासून ढोपरापर्यंत सोलूनट काढायची प्रतिज्ञा राज्यातला गरीब शेतकरी कधीच विसरू शकणार नाही.

आबा हे धडाडीचे निर्णय घेऊ शकले कारण, त्यांच्या पाठीशी शरद पवार भक्कमपणे उभे राहिले. अगदी सुरुवातीपासून सर्व विरोध डावलून पवारांनी आबांच्या पाठीवर हात ठेवला. युती सरकारच्या काळात पवारांनी आर आर पाटलांना पक्षाचा मुख्य प्रतोद केल्यानंतर काँग्रेसमध्ये अनेकांच्या भुवय्या उंचावल्या होत्या. पण आबांनी युतीच्या मंत्र्यांचे विधानसभेत वाभाढे काढून पवारांचा विश्वास सार्थ करून दाखवला. म्हणूनच पवारांनी इतर सुभेदारांना बाजूला सारून आर आर पाटलांना थेट उपमुख्यमंत्रिपदी बसवलं.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका