पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसने सलग आठव्या वर्षी आपले वर्चव सिद्ध केले आहे. बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत एकूण २१ पैकी १४ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. ७ पैकी ३ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. अजित पवारांनी मोठी फिल्डिंग लाऊनही एक जागा भाजपने जिंकली आहे.
रविवार दि. २ जानेवारीला या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. पुणे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या या निवडणुकीत २१ पैकी १४ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उरलेल्या सातपैकी हवेली तालुक्यातील एका जागेसाठी मैत्रीपूर्ण लढत झाली, तर उरलेल्या सहा जागांपैकी कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले होते. आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालानुसार यापैकी तीन जागा राष्ट्रवादीने मिळवल्या असून एका जागेवर भाजपने विजय मिळवला आहे.
अजित पवारांची राजकीय कारर्कीद याच जिल्हा बँक निवडणुकीपासून सुरु झाली होती. पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. १९९१ पासून अजित पवारांनी जिल्हा बॅंकेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे ही निवडणूक अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची बनली होती. या निवडणुकीत सत्ता राष्ट्रवादीने मिळवली असली तरी एक भाजप उमेदवाराने विजय मिळवल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीची मतमोजणी आज झाली. यावेळी सात पैकी तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेत. त्यामुळे राष्ट्रवादीने पुन्हा बँकेवर आपली सत्ता काबीज केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील चांदेरे, आमदार अशोक पवार, विकास दांगट अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची नावे आहेत तर बिनविरोध निवडून आलेल्या १४ संचालकांपैकी १३ संचालक हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आहेत. दरम्यान, या निवडणुकीत भाजप पाठिंबा्याने एक सदस्य निवडून आला आहे. बँक पतसंस्थांच्या गटामधून भाजप पुरस्कृत प्रदीप कंद ११ मतांनी विजयी झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- संजय राऊतांनी गोव्यात घेतली काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- पुणे जिल्हा बँकेची आज मतमोजणी; अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला
- अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती
- ‘..तरी चीनचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधानांबरोबर फाफडा, ढोकळा खाताना दिसतील’, संजय राऊतांचा टोला
- ‘…पण अखेर त्याने मला गाठलंच’, पॉझिटिव्ह आल्यानंतर रोहित पवार यांची भावनिक पोस्ट
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<