fbpx

माझ्याकडे शिरूरसाठी 5-6 प्रबळ उमेदवार, त्यामुळे अजितदादांना तिकडे जाण्याची गरज नाही

पुणे: काही दिवसांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी तयार असल्याचं विधान केलं होतं, याबद्दल पक्षाध्यक्ष शरद पवार यांना विचारला असता माझ्याकडे 5 – 6 तगडे उमेदवार असल्याने अजित दादांना शिरूरमध्ये जाण्याची गरज लागणार नसल्याचं सांगितले आहे.

शिरूर लोकसभेच्या उमेदवारीवरून बोलत असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण पवारांची औलाद असून साहेबांनी आदेश दिल्यास शिरूरमध्ये लढून जिंकूदेखील असा विश्वास व्यक्त केला होता. यानंतर शिरूरचे विद्यमान खा. आढळराव पाटील यांनी अजितदादा पवारांची, तर मी मराठ्याची अवलाद आहे. संपूर्ण पवार खानदान मला हरवू शकत नसल्याची घणाघाती टीका केली होती. त्यामुळे शिरुर लोकसभेला अजित पवार विरुद्ध आढळराव पाटील सामना होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

दरम्यान, शरद पवार यांनी आपल्याकडे शिरुरसाठी तगडे उमेदवार असल्याने अजित दादांना शिरूरमध्ये जाण्याची गरज नसल्याचे सांगितल्याने. अजित पवार हे शिरूरचे उमेदवार नसणार हे स्पष्ट झाले आहे. तर पवार यांच्याकडे असणारे ते ५ – ६ तगडे उमेदवार कोण या बद्दलचे कयास सध्या राजकीय वर्तुळात लावले जात आहेत.

1 Comment

Click here to post a comment