सरकारच्या निणर्यामुळे गरीबांच्या पोटाला चिमटा बसला- अजित पवार

अजित पवार

सांगली: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु असून आज सांगलीत सभेदरम्यान अजित पवारांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. पवार म्हणाले
सरकारच्या निणर्यामुळे गरीबांच्या पोटाला चिमटा बसत आहे. अशी टीका केली.

अजित पवार पुढे म्हणाले, सहकार मंत्र्यांनी ३२ रुपये किलोने साखर घेणार असे आश्वासन दिले. त्याबाबत विचारणा केली तर म्हणतात की ती म्हणायची गोष्ट झाली. गंमत सुरू आहे का? या सरकारच्या निणर्यामुळे गरीबांच्या पोटाला चिमटा बसतो.

आम्ही सत्तेत असतांना आम्ही या भागात वीज दिली. शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर दिले. दुष्काळात चारा छावण्या उभारल्या. हे सरकार बळीराजासाठी काही करताना दिसत नाही. पालकमंत्र्यांना या भागाबाबत आपुलकीच नाही. भाजप-सेनेने राज्याची दुरावस्था केली आहे. असे पवार म्हणाले.