#महापूर : ‘गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता असूनही कोल्हापूर – सांगलीमध्ये नियोजनात शून्यता’

ajit pawar

टीम महाराष्ट्र देशा : राज्यावर महापूराचे संकट असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा दिमाखात सुरु आहे. तर या शिवस्वराज्य यात्रेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजानेश यात्रेला लक्ष केले आहे. अपयश झाकण्यासाठी सरकारने महाजनादेश यात्रा काढली आहे, असा टोला खा. अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारला लगावला आहे. तर गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता असून देखील कोल्हापूर – सांगलीमध्ये नियोजनात शून्यता आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. आज शिवस्वराज्य यात्रा शिर्डी येथे आली आहे. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कोल्हे म्हणाले की, सरकार यशस्वी असतं तर यात्रा काढाण्याची गरज नव्हती. प्रत्येक स्तरावर राज्यसरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे आपले अपयश झाकण्यासाठी सरकार यात्रा काढत आहे. तसेच यावेळी अजित पवार यांनी देखील कोल्हापूर – सांगलीच्या जल आपत्तीवरून सरकारवर निशाणा साधला आहे. तर सरकारच्या भोंगळ कारभारामुळेचं आज कोल्हापूर आणि सांगलीची दुरावस्था झाली आहे. गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता असून देखील अशी परिस्थिती ओढावली आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.

दरम्यान राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक गावं पाण्यात बुडाली आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सातार जिल्ह्यात परिस्थिती अतिशय विदारक आहे. हजारो नागरिक पाण्यात अडकले आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तर एनडीआरएफ, आर्मी आणि नौदलाची पथक आपतग्रस्त भागात तैनात आहेत. मात्र कुठेतरी सरकार अपयशी पडत असल्याचं दिसत आहे, अशी टीका विरोधकांकडून होत आहे.