‘नाच्या’च्या शब्दावर विश्वास ठेवू नका; ‘या’ माजी मंत्र्यावर टीका करताना पवारांची घसरली जीभ

ajit pawar

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा नेते लक्ष्मण ढोबळे यांच्यावर सडकून टीका केली आहे. टीका करताना अजित पवारांची जीभ घसरली आहे. ते मंगळवेढा प्रचार सभेदरम्यान बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, ‘हलगीच्या तालावर झिंगाट झालेल्या नाच्याच्या शब्दावर विश्वास ठेवू नका. सारखे-सारखे कुंकू बदलणारे तुमच्याशी प्रामाणिक काय राहणार अशी टीका पवार यांनी लक्ष्मणराव ढोबळे यांच्यावर केली. पुढे पवारांनी ढोबळे यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला म्हणाले, ‘काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना आमदार केले, पालकमंत्री केले, ते उपकार विसरले की काय? आपले वय काय, आपण काय करतो याचेही भान नाही,’ असा टोलाही ढोबळेंना पवारांनी लगावला.

दरम्यान, ‘भाजप सरकारने मागील पाच वर्षात फक्त आश्वासनांची घोषणाबाजी केली. दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी सत्तेचा गैरवापर करीत शेतकरीविरोधी धोरण अवलंबिले,’ असे म्हणत पवारांनी सरकारवर टीका केली.

महत्वाच्या बातम्या