शेतकरी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला फाशीच द्या – अजित पवार

नागपूर : “शेतकरी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी,” अशी मागणी करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली आहे.

‘शेतकऱ्यांना पीककर्ज वेळेत मिळायला हवं. बँकेचा सचिव शेतकरी महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत आहे. हे महाराष्ट्रात कधी घडलं नव्हतं. त्याच्या घरी आयाबहिणी नाहीत काय ? सरकार अशांवर कारवाई का करत नाही?’ असा सवाल करत अजित पवारांनी सभागृहात सरकारचे चांगलेच वाभाडे काढले.

दरम्यान, पीककर्जासाठी बँक मॅनेजरने शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाण्यात घडला होता. महिलेच्या तक्रारीवरुन सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा मॅनेजर आणि शिपायाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. अखेर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या दाताळा शाखेचा मॅनेजर राजेश हिवसे आणि शिपाई मनोज चव्हाण या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे.

बँकांनो,तर तुमच्या कर्जवसुलीस माझा असहकार : जिल्हाधिकारी

You might also like
Comments
Loading...