शिवतारे… तू यंदा आमदार कसा होतो तेच बघतो !

टीम महाराष्ट्र देशा : सध्या देशभरात निवडणुकांचे जोरदार वाहत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर टीका करण्यात कोणतीच कसर ठेवत नाहीत. अशातचं राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी विजय शिवतारे यांच्यावर निशाणा साधत ‘विजय शिवतारे आता पोपटासाराखा बोलायला लागलाय. शिवतारे… तू यंदा कसा आमदार होतो तेच बघतो’ असे वक्तव्य केले आहे. ते बारामतीत घेतलेल्या सभेत बोलत होते.

काय म्हणाले अजित पवार ?

राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता सभा बारामतीत पार पडली. यावेळी विजय शिवतारे यांच्यावर टीका करत अजित पवार म्हणाले की, शिवतारे… तू यंदा कसा आमदार होतो तेच बघतो, असा इशाराच राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी शिवतारेंना दिला आहे. अजित पवारने एकदा ठरवलं की एखाद्याला नाहीच आमदार होऊन द्यायचं… तर तो नाहीचं आमदार होत…

Loading...

एवढेचं  नाहीतर अजित पवार यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर देखील जोरदार टीका केली. ‘तुझी डिग्री काय?? तु काय बोलतो काय?? तुझ्या नावातचं  विनोद आहे. तु शिक्षणमंत्री आहे ना… तिकडे लक्ष दे की जरा… ‘अशा भाषेत त्यांनी तावडेंचा समाचार घेतला.