Share

Ajit Pawar | “सध्या सरकारचा ‘रेटून बोल पण खोटं बोल’ हा धंदा..”; अजित पवारांची सडकून टीका

Ajit Pawar | अहमदनगर : गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातून एकापाठोपाठ प्रकल्प बाहेर चालले आहे. आधी वेदांता-फॉक्सकॉन (Vedant Foxcon) आणि नागपूरमध्ये होणारा C- 295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प आता गुजरातमधील वडोदऱ्याला होणार आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं दिसत आहे. विरोधी पक्षनेत्यांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहेत.

ठाकरे विरुद्ध शिंदे गटात कलगीतुरा रंगलेला असतानाच सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असा सामनाही पाहायला मिळत आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन करून चार महिने उलटली आहेत. तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारला फैलावर घेतलं आहे. अशातच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. “सरकारच्या नाकर्तेपणामुळे मोठे प्रकल्प बाहेर गेले आहेत,” असा आरोप अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. ते शुक्रवारी (४ नोव्हेंबर) अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे राष्ट्रवादीच्या मंथन शिबीरात बोलत होते.

तसेच “सध्या सरकारचा ‘रेटून बोल पण खोटं बोल’ हा धंदा सुरू आहे”, असा टोलाही लगावला. “अंगलट आल्यावर दिल्लीला जातो आणि प्रकल्प घेऊन येतो सांगत आहेत. मात्र, यांच्यामुळेच बेकारी वाढत आहे. नोकर्‍यांवर गंडांतर येत आहे. हे सरकार जनतेची पूर्णपणे फसवणूक करत आहेत. सध्या सरकारचा ‘रेटून बोल पण खोटं बोल’ हा धंदा सुरू आहे,” अशा शब्दात त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

पुढे ते म्हणाले, “महाराष्ट्राचे प्रकल्प बाहेर जात आहेत. यांचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. यांना दिल्लीत गेल्यावर तोंड वर करून बोलण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्रातून प्रकल्प गेले हे शिंदे सरकारचे अपयश आहे. हे सरकार जितका काळ सत्तेत राहिल तितकी बेकारी, बेरोजगारी राज्यात वाढणार आहे,” असं सांगत अजित पवार यांनी राज्यसरकारवर हल्ला चढवला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | अहमदनगर : गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातून एकापाठोपाठ प्रकल्प बाहेर चालले आहे. आधी वेदांता-फॉक्सकॉन (Vedant Foxcon) आणि नागपूरमध्ये …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now