… तर गाठ माझ्याशी आहे, अजित पवारांचा पिचडांना दम 

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले वैभव पिचड यांना हरवण्यासाठी अनेक भाजपच्या नेत्यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यात भाजप जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे, सुनीता भांगरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

यावेळी बोलताना अजित पवारांनी पिचड पिता-पुत्रांवर सडकून टीका केली. त्यांनी भाजपसारख्या पक्षाचा पराभव करण्यासाठी एकविचाराचे सर्व एकत्र आले आहेत. राष्ट्रवादीतून राजे गेले, सेनापती गेले, नेतेही गेले. पण शरद पवार ठामपणे काम करत आहेत असं विधान करत कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करत सत्ता राष्ट्रवादीलाचं द्या अस आवाहन केले.

पुढे बोलताना अजित पवार यांनी १९९५-१९९९ मध्ये युतीचं सरकार तेव्हा पिचडांना विरोधी पक्षनेतेपद दिलं. मंत्रिपदे दिली, जि.प. अनेक पदे अकोलेत यांनाच दिली. तरीही पिचड गेले, मोठं पाप पिचडांनी केलं आहे. एकास एक उमेदवार देण्याच्या निर्णयावर ठाम राहा. आमिषाला बळी पडू नका. कार्यकर्त्यांना दमबाजी करु नका असं म्हणत मधुकर पिचड यांच्यावर टीका केली.

दरम्यान, पुढे बोलताना अजित पवार यांनी पिचड डोळ्यात पाणी आणतील, भावनिक होतील, निवडून द्या असा नाटकीपणा करतील, पण तुम्ही बळी पडू नका अस आवाहन केले. तसेच ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. केसाला धक्का लावला तर अजित पवारशी गाठ आहे असा इशाराही अजित पवारांनी पिचड पिता पुत्रांना दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...

Loading...

Loading...