फडणवीसांना बेटी भगाव आणि बेटी नचाओ चालते का ? : अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा : अटीतटीचा सामना रंगलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादी रॅली आणि सभांचा धडाका लावला आहे. आज जेजुरीमध्ये बारामती लोकसभेच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यमंत्री विजय शिवतारेंना चांगलेच शाब्दिक फटकारे मारले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील चिमटे काढले.

Loading...

यावेळी अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस आज शरद पवारांवर टीका करत आहेत. पण फडणवीस यांना विसर पडला असावा की, फडणवीसांच्या वया इतकी शरद पवार साहेबांची राजकीय कारकीर्द आहे. तसेच आज पवारांचे बेटी बचाओ असे धोरण चालू आहे असे फडणवीस म्हणत आहेत मात्र फडणवीस यांना बेटी भगाव आणि बेटी नचाओ हे धोरण चालते का ? असा सवाल अजित पवार यांनी केला. या विधाना मागे राम कदम यांच्या विधानाची आणि डान्स बार पुन्हा चालू झाल्याची पार्श्वभूमी आहे.

शिवतारे यांना आयती करून ठेवलेली कामे देखील १० वर्षात सांभाळता आली नाहीत. एक रस्ता देखील व्यवस्थित पूर्ण करता आला नाही, आणि आता माझ्या समोर गप्पा मारत असल्याची टीका अजित पवार यांनी केली.

दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात खा. सुप्रिया सुळे पुन्हा एकदा राष्ट्रावादी कॉंग्रेसकडून लोकसभेच्या मैदानात उतरल्या आहेत, तर भाजपकडून दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुरुवातीला सुळे यांना सोपी वाटणारी निवडणूक आता अटीतटीची बनली आहे.Loading…


Loading…

Loading...