मुख्यमंत्र्यांकडे असणारं गृहखात बिनकामाचं, अजित पवार संतापले

टीम महाराष्ट्र देशा : दिवसेंदिवस पिंपरी चिंचवड परिसरातील गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. मुलींवर होणाऱ्या अत्याचारांची संख्या सर्वाधिक आहे. ५ वर्षात कायद्याची तलवार बोथट झाली आहे, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारला चांगलेचं सुनावले आहे.

याबाबत अजित पवार म्हणाले की, माझ्या पिंपरी-चिंचवडची ही काय दशा झाली आहे? लहान मुलींवर अत्याचार होत आहेत. पीडितांना न्याय मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ५ वर्षांत कायद्याचा वचक बसण्यासाठी सरकारनं काय केलं? मुख्यमंत्री, गृहखातं म्हणजे धार नसलेली तलवार बनलं आहे.

गुन्हेगारांचं शहर अशी पिंपरी चिंचवडची नवी ओळख निर्माण होतेय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण शहरातमध्ये खून, माऱ्यामाऱ्या, महिला अत्याचार अशा गुन्ह्यांची संख्या दिवसागणिक वाढतचं आहेत. मागील महिनाभरात पिंपरीत 5 बालिकांवर अत्याचार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अजित पवार यांनी या मुद्द्यावर थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केल्यानंतर सरकार आणि प्रशासन या गोष्टीची गंभीर दखल घेत नसल्याचं दिसत आहे.