fbpx

चंद्रकांत पाटलांना काहीही बोलायची सवय; त्यांच्या स्वभावाला औषध नाही : अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा : २०२४ च्या निवडणुकीला संपूर्ण बारामतीदेखील आमच्याकडे असेल असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्याला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देत चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

अजित पवार यांनी ‘चंद्रकांत पाटील यांना काहीही बोलण्याची सवय आहे. त्यांच्या स्वभावाला औषध नाही. ते बोलले की मिडीयाला खाद्य मिळते अशी टीका पाटील यांच्यावर केली आहे. तत्पूर्वी, २०२४ च्या निवडणुकीला संपूर्ण बारामतीदेखील आमच्याकडे असेल असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. तसेच राष्ट्रवादीचे नेते रात्रीचे मुख्यमंत्र्यांना भेटत असल्याचा गौप्यस्फोटही पाटील यांनी केला होता. या पार्श्वभुमीवर अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, गुरुजन गौरव पुरस्कार वितरणासाठी अजित पवार पुण्यात आले होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी हे विधान केले आहे. यावेळी लेखक डॉ.अनिल अवचट आणि लेफ्टनंट जनरल दत्तात्रेय शेकटकर, कॉम्रेड मुक्ता मनोहर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना गुरुजन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.