काश्मीरमध्ये तिरंगा फडकवला याचा आम्हाला पण अभिमान, मात्र ती लोकशाही नाही

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळात जम्मू काश्मीरचे कलम 370 हटवले आहे. मात्र याला कॉंग्रेस आणि मित्र पक्षांनी विरोध केला होता. यावरून भाजप नेत्यांकडून कॉंग्रेस आणि मित्रपक्षाला लक्ष्य केले जात आहे. यावर आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. काश्मीर खोऱ्यात तिरंगा फडकला याचा आम्हालाही अभिमान आहे. पण त्याची प्रक्रिया चुकीची झाली असे, म्हणत अजित पवारांनी राज्यासह केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. आज अजित पवार पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की, काश्मीर खोऱ्यात तिरंगा फडकला याचा आम्हालाही अभिमान आहे. पण तिथल्या लोकांनी ऐकेकाळी निवडून दिलेल्या नेत्यांना ४० ते ४५ दिवस नजर कैदेत ठेवण्यासारखा प्रकार जगातील कोणत्याही लोकशाही असलेल्या देशात दिसत नाही.

तसेच जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यापासून फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुला आणि मेहबुबा मुफ्ती नजर कैदेत आहेत. गुलाब नबी आझाद यांना जम्मू काश्मीरमध्ये जाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागली. आपल्याच देशातील एखाद्या भागात जाण्यासाठी कोर्टात धाव घ्यावी लागते, हे कशाचे ध्योतक आहे? असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला.

दरम्यान विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आघाडीचे पुणे शहरातील जागावाटप जाहीर झाले आहे. यासंबंधीची घोषणा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. पुणे शहरातील 8 पैकी राष्ट्रवादी काँग्रेस 4, काँग्रेस 3 तर एक जागा मित्रपक्ष लढवणार आहे अशी माहिती अजित पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्यात दिली आहे.

Loading...

Loading...