जनतेपेक्षा तुम्हाला प्रचार महत्वाचा; अजितदादांनी टोचले सत्ताधाऱ्यांचे कान

blank

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेनी जनसंपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्राही सुरु आहे. या यात्रेतील दुसरी सभा राजगुरुनगर-खेड येथे पार पडली यावेळी अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली

अजित पवार यांनी ‘आज राज्यातील जनता पुरात वाहून जात असताना मुख्यमंत्री मात्र महाजनादेश यात्रेतून निवडणुकीचा प्रचार करत आहेत. पुरात अडकलेली जनता महत्त्वाची की निवडणुकाचा प्रचार महत्त्वाचा? असा सवाल भाजप आणि शिवसेनेला विचारला आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या महाजनादेश यात्रेनिमित्त महाराष्ट्राचा दौरा करत आहेत तर युवसेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे जन आशीर्वाद यात्रेवर आहेत. तर दुसरीकडे राज्याच्या काही भागांत जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यामुळे अजित पवार यांनी हे विधान केले आहे.

तसेच अजित पवार पुढे बोलताना कलम ३७० वर भाष्य केले. त्यांनी ‘काल ३७० कलम काढले त्याचे मी समर्थन करतो. चांगल्याला चांगलंच बोललं पाहिजे. आता पाकव्याप्त काश्मीर आपल्यात यावा ही भारतीयांची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने या सरकारने पाऊले उचलली पाहिजे असेही अजितपवार म्हणाले.

शिवस्वराज्याची सनद की राष्ट्रवादीचा आगामी निवडणुकीचा जाहीरनामा ?

जयंत पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, विधानसभा निवडणुकीसाठी आखली रणनीती

…म्हणून मी भाजपात आलो, शिवेंद्रराजेंनी दिले पक्षांतराचे स्पष्टीकरण