२०-४० कोटी रुपये देवून आमदारांना फोडलं जातंय – अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. शिवस्वराज्य यात्रेनिमित्त भोकरदन येथील सभेत अजित पवार यांनी २०-४० कोटी रुपये देवून आमदारांना फोडले जात असल्याचा आरोप अजित पवार यांनी भाजपवर केला आहे.

अजित पवार यांनी २० ते ४० कोटी रुपये देवून आमदारांना फोडले जात आहेत असा आरोप केला. तसेच भाजपकडे एवढा निधी आला कुठुन असा सवाल करतानाच कर्नाटक आमदारांकडे ११ कोटीची कार आली असल्याचा किस्सा अजित पवार यांनी यावेळी सांगितला. तसेच उद्योगधंदे बंद झाले आहेत. कंपन्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे आता लक्षपूर्वक काम करा आणि आघाडीचे राज्य आणल्याशिवाय पर्याय नाही असेही अजित पवार म्हणाले.

पुढे बोलताना बोलताना अजित पवार यांनी ‘महाराष्ट्रातील सरकारमध्ये शेतकऱ्यांचे  प्रतिनिधीत्व करणारं कोण दिसतं नाही. धनंजय मुंडे यांनी २२ मंत्र्यांचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी उघड केले परंतु त्या सर्वांना क्लीनचीट देण्यात आली फक्त एकनाथ खडसे वगळता असा टोलाही अजित पवार यांनी लगावला आहे.

दरम्यान अजित पवार यांनी मनसेचे नेते राज ठाकरे यांना ईडीची नोटीस काढली आहे. हे कोणत्या प्रकारचे राजकारण सुरु आहे. जो विरोधात बोलतो त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय असा आरोपही अजित पवार यांनी केला आहे.