‘शरद पवार, अजित पवार कोणीही येऊ द्या असं म्हणणाऱ्या आढळरावांची मस्ती जिरली’

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला फारसे यश मिळाले नाही. परंतु गेली १५ वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असणाऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करत विजय मिळवला.

या निवडणुकीपूर्वी गेली १५ वर्षे खासदार असणाऱ्या आढळराव पाटील यांनी ‘शरद पवार, अजित पवार कोणीही येऊ द्या विजय आपलाच होणार अस विधान करत होते. परंतु निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शरद पवार, अजित पवार कोणीही येऊ द्या, असे आव्हान शिवाजीराव आढळराव पाटील लोकसभा निवडणुकीत देत होते. एवढी आणि अशी मस्ती त्यांना होती. तरी त्यांचा पराभव झाला. मस्ती जिरली. कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे, अस विधान केले आहे.

दरम्यान, जशी आढळरावांची सत्ता गेली तशी राज्यातूनही भाजप आणि शिवसेनेची सत्ता जावू शकते त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत असंही अजित पवार पुढे बोलताना म्हणाले.