Share

Ajit Pawar | टाटा एअरबस प्रकल्पावरून अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल, म्हणाले…

Ajit Pawar | मुंबई : नागपूरमध्ये होणारा  C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. या बातमीनंतर  महाविकास आघाडीकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.

काय म्हणाले अजित पवार (Ajit Pawar)

8 सप्टेंबर 2021 ला केंद्र सरकारने एअरबस कंपनीसोबत करार केला होता. मग आता असं काय झालं की प्रोजेक्ट गुजरातला नेला जातोय. दरवेळी प्रकल्प गेला की हे सांगतात जाऊद्या. आपण आणखी मोठा आणू. आता तर म्हणतात हा प्रकल्प आलाच नव्हता. हे काय चाललंय?, असा सवाल अजित पवार यांनी सरकारला केला आहे. अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी समोर येऊन बोलावं. सरकारची भूमिका मांडावी. ओळीने चार प्रकल्प गुजरातला गेले. या सरकारने ते थांबवण्यासाठी काहीच केलं नाही. या नाकर्तेपणाला कोण जबाबदार आहे?, असा सवालही पवारांनी याठिकाणी उपस्थित केला आहे.

दरम्यान, भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी आधीचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या टक्केवारीमुळे टाटा-एअरबसचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून बाहेर गेल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपाला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, उगाच आपलं उठायचं काहाही आरोप करायचे नाहीत.याची चौकशी करा, दूध का दूध होऊ द्या.

तसेच, टाटा एयरबस प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या की, तुम्ही(भाजप) म्हणत आहात हा प्रकल्प एक वर्षापूर्वीच गेला. नंतर तुम्ही म्हणत आहात की आम्ही हा प्रकल्प नागपूरलाच करणार आहोत आणि नंतर म्हणत आहात की उपमुख्यमंत्री मन वळवण्यात कमी पडले. त्यांच्या मंत्रिमंडळातील प्रत्येक व्यक्ती काहीतरी वेगळं बोलते. त्यामुळे मी प्रचंड गोंधळले आहे. मी विरोधक म्हणून विचारत नाही.मी या राज्याची एक नागरिक आहे. या देशाची एक नागरिक आहे आणि एक लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे मला वाटतं हा आपल्या सगळ्यांनाच अधिकार आहे की नक्की सत्य काय आहे. त्यामुळे टाटा एअर बस प्रकरणात सरकारने वस्तूस्थिती समोर आणावी. राज्यातील गुंतवणूक दुसरीकडे कशी जाते हा नागरिक म्हणून प्रश्न पडतो.
महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | मुंबई : नागपूरमध्ये होणारा  C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics