तंत्रज्ञानाच्या युगात आंबा खाण्याचा सल्ला देणारे बौद्धीक दिवाळखोर : अजित पवार

ajit pawar and sambhaji bhide

टीम महाराष्ट्र देशा : तंत्रज्ञानाच्या युगात आंबा खाण्याचा सल्ला देणारे बौद्धीक दिवाळखोर आहेत असे म्हणत भिडे गुरुजींवर नाव न घेता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने शनिवारी सांगवीतील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात ‘जॉब फेअर’चे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमात त्यांनी भाजपावर टीकेचे ताशेरे ओढले.

नेमकं काय म्हणाले अजित पवार ?

‘२१ व्या शतकात भारताने विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तुंग झेप घेतली आहे. इस्त्रो जगभरातील शेकडो देशांचे उपग्रह भारतातून प्रक्षेपित करते. तर दुसरीकडे प्रतिगामी विचाराची व्यक्ती ‘आंबा खाण्याचा’ सल्ला देते. अशा विचारवंतांची कीव येते’.