Ajit Pawar | “6 महिने खरंच दिवे लावले असते तर पदवीधरांनी, शिक्षकांनी निवडणून दिलं असतं”; अजितदादांची टोलेबाजी

Ajit Pawar | मुंबई : मुंबईमध्ये सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. या अधिवेशना दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील निवडणुकींबाबत बोलताना विरोधकांवर तुफान टोलेबाजी केली आहे.

Ajit Pawar Criticize on state government 

“राज्यात ८ महिने झालं शिंदे-फडणवीसांचं सरकार आलं. पण कोणी काहीही म्हणो, सगळ्यात पहिला झटका भाजपला बसला. कारण शपथ घेईपर्यंत भाजपच्या आमदारांना वाटत होतं की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील”, असे अजित पवार म्हणाले आहेत.

Ajit Pawar talk about CM And DCM

“मी त्यावेळच्या राज्यपालांना (भगतसिंह कोश्यारींना) भेटलो तेव्हा ते सुद्धा म्हणाले, ‘अरे हे काय झालंय’ आदल्या दिवशी देवेंद्र फडणवीस म्हणाले मी मंत्रिमंडळात जाणार नाही. त्यावेळी कोणाकोणाच्या डोळ्यात पाणी आलं हे आपल्याला चांगलं माहिती आहे, गिरीश”, असं म्हणताच अजित पवारांच्या लक्षात आलं आपण गिरीश महाजन यांचा एकेरी उल्लेख केला आहे.

त्यानंतर अजित पवार म्हणाले, “‘गिरीश महाजन साहेब आपण मंत्री आहात. अंकल…’, असं म्हणत अजित पवारांनी महाजानांना कोपरखळी मारली आहे.  पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, “देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की बंड वगैरे काही करु नका त्यांना दोघांना समजलं तर सगळ्यांचा सुपडा साफ होईल. वरुन आदेश आहेत. आणि मग सगळ्यांनी गपगुमानं ऐकलं”, असंही अजित पवारांनी सांगितलं आहे.

मंत्रिमंडळ विस्तारावरुन अजित पवारांची टीका

“सरकार सुरु झालं कित्येक दिवस तर दोघेच होते. त्यावर म्हणायचे सारखेच आम्ही खंबीर आहोत आम्ही खंबीर आहोत. पुढं काही दिवसांनी मंत्री वाढले. पण आता 8 महिने झाले तरी मंत्रिमंडळ काही पुर्ण होईना. मी तर सारखं सांगतोय महिलांना प्रतिनिधीत्व द्या. पण वरुन आदेश दिल्याशिवाय ते काय करणार?”, असं म्हणत अजित पवारांनी मंत्रिमंडळ विस्तारावरुन ताशेरे ओढले आहेत.

“बालेकिल्लाही राखता आला नाही”

“या सरकारला 6 महिने पुर्ण झाल्यानंतर राज्यात निवडणुका झाल्या. मतदान कोणी केलं राज्यातल्या पदवीधर लोकांनी, शिक्षकांनी. सगळे नाउमेद झालेत. चांगलीच चपराक बसली. अमरावतीमधील 5 जिल्ह्यांत अपयश आलं. नागपूर बालेकिल्ला तोही राखता आला नाही. झाकली मूठ सव्वालाखाची पाठिंबा देऊ  म्हणाले अन् सत्यानाश झाला, पराभव झाला. मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यांत पराभव झाला”, असंही अजित पवारांनी सांगितलं.

“त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे”

‘भाजप केंद्रात सत्तेत आहे, राज्यात सत्ता आहे. अनेक ठिकाणी आमदार निवडून आलेत. तरीही दुसऱ्यावरच यांचा डोळा. दुसऱ्याचा कोण आपल्याकडे येतोय का? काँग्रेसचा येतो का राष्ट्रवादीचा. आत्मचिंतन केलं पाहिजे. उत्तर महाराष्ट्रातही आपल्याला उमेदवार देता आला नाही. कितीही झालं तरी सत्यजीत तांबेंच्या तिन पिढ्या या काँग्रेसमध्येच काम करतात”, असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर ताशेरे ओढले आहेत.

“6 महिने खरंच दिवे लावले असते तर पदवीधरांनी, शिक्षकांनी निवडणून दिलं असतं”

“काय मोठं सांगताय. हे केलं ते केलं. असं झालं तसं झालं. इतके 6 महिने दिवे लावले असते तर पदवीधरांनी आणि शिक्षकांनी निवडणून दिलं असतं तुम्हाला. नाकारलं आहे तुम्हाला”, अजित पवार यावेळी चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळाले. त्यांच्या आक्रमकतेवर सभागृहात मध्येच त्यांना बोलण्यात रोखण्याचा प्रयत्न करताना अजित पवार त्यांच्यावरही चांगलेच भडकले.

“पुण्याचा निकाल लागल्यावर आहे ते पण जाईल”

पुण्याचा निकाल लागला तर आहे ते पण जाईल. २ तारीख यायची बाकी आहे. पुण्याचा निकाल काय लागेल हे माहिती नाही. पण कोणी चिंचवडमध्ये काय केलं. कसब्यात कोणी काय केलं हे मी निकाल लागल्यावर सांगणार. निकाल काहीही असो पण गिरीश महाजन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना 3-4 दिवस बसावं लागलं ना”, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button