राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील ‘त्या’ टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात…

टीम महाराष्ट्र देशा : ‘नारायण राणेंना ज्या व्यक्तीमुळे शिवसेना सोडावी लागली, तीच व्यक्ती राज्याचा प्रमुख झालेली त्यांना आवडेल का? नाहीच आवडणार हे साधे सरळ गणित आहे. त्यामुळे राणे जे काही बोलले ते त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून बोलले आहेत,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

पवार यांच्या हस्ते रविवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पुण्यात शिवभोजन थाळीचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नारायण राणे यांनी शनिवारी पुण्यात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. राणेंच्या ‘त्या’ टीकेला अजितदादांनी रोखठोक प्रत्युत्तर यावेळी बोलताना दिले.

Loading...

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, ‘नारायण राणेंना उद्धव ठाकरेंमुळेच शिवसेना सोडावी लागली होती. त्यानंतर ते शिवसेनेबद्दल कधीच सकारात्मक बोलले नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी निष्ठा असून त्यांच्याबद्दल आदर असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, ‘उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री असून मुख्यमंत्री होण्याच्या दृष्टीने त्यांनी आयुष्यात एकदाही प्रयत्न केला नाही. लोकांचे प्रश्न सोडवण्याचा त्यांना कुठलाही अनुभव नाही. माझ्या महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे जाईल याची चिंता मला आहे, अशी टीका नारायण राणे यांनी शनिवारी केली होती.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात