मंत्रालयाचे नाव आधी सचिवालय होते आता आत्महत्यालय झालंय-अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा: मंत्रालयाचे नाव आधी सचिवालय होते. आज ते आत्महत्यालय झाले आहे. कुणी आत्महत्या करु नये, यासाठी मंत्रालयात जाळी लावली आहे. पण संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी नाराज, नैराश्यग्रस्त आहे. मग चांदा ते बांदा जाळी कशी लावाल? असा सवाल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारला केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या पाचव्या टप्प्याला आजपासून अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून सुरवात झाली. यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

दोन लाख हेक्टर शेतीचे क्षेत्र गारपिटीमुळे उद्ध्वस्त झाले. कितीतरी जनावरे, पाखरे मरण पावली, पिके आडवी झाली. एवढ्या मोठ्या क्षेत्राला दोन लाख कोटींची मदत दिली तरी कमी पडेल. पण कृषिमंत्री म्हणतात, दोनशे कोटींची मदत देणार. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. अशी टीका सुद्धा अजित पवार यांनी केली आहे.

तर राज्यात बेरोजगारीचा प्रश्न उग्र झाला आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. त्यांना नैराश्य आले आहे. असे असताना सरकार पदभरती बंद करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आल्यावर आम्ही ताबडतोब भरती चालू करू. अस आश्वासन सुद्धा अजित पवार यांनी या जाहीर सभेत दिल

दरम्यान, प्रशासनावर जबर पकड असणाऱ्या अजित पवारांनी भाजपच्या मंत्र्यांचा जाच जनतेला होत होताच आता अधिकारी वर्गही त्रस्त झालाय. अकोल्याच्या अतिरिक्त मुख्याधिकाऱ्यांनी भाजप मंत्र्याच्या जाचाला कंटाळून थेट राजीनामाच दिला. जनतेसाठी अधिकाऱ्यांकडून काम करुन घेण्याची एक हातोटी असते. ती भाजपच्या मंत्र्यांकडे नाही. अशी खंत सुद्धा व्यक्त केली.

पहा काय म्हणाले अजित पवार