दूध का दूध पानी का पानी व्हायलाच हवं, ते संभाषण समाजापुढे आणा – अजित पवार

पुणे:  वारीदरम्यान साप सोडण्याचं विधान कोणी केल असेल यावर माझा विश्वास नाही. मात्र, तसं काही झाल असेल तर दूध का दूध पानी का पानी करायलाच हवं, त्यामुळे ते संभाषण समाजापुढे आणा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आषाढी एकादशीला पंढरपुरात पूजा करून देणार नसल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला होता. दरम्यान, मराठा संघटनांकडून होतं असलेला विरोध पाहता आपण पंढरपूरला जाणार नसल्याच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं.

तसेच काही लोकांचा वारकऱ्यांमध्ये साप सोडण्याचे तसेच चेंगराचेंगरी करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला होता. याबद्दलचे पुरावे तपास यंत्रणांकडे असल्याचा दावाही त्यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरून विरोधकांकडून त्यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

आज पुण्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमानंतर बोलताना अजित पवार यांनी मराठा आरक्षण आणि मंत्र्यांकडून देण्यात येणाऱ्या विधानांचा चांगलाच समाचार घेतला. ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं, आता मराठा समाजाचा अंत पाहू नये. आज सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मी आणि धनंजय मुंडे याबद्दल भूमीका मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

मराठा आंदोलन पेटवणाऱ्या नेत्यांचं संभाषण आमच्या हाती – चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री बदलला तर त्याचा आम्हाला फायदाच; फडणवीसांच्या डोक्यावर पवारांचा हात