जलयुक्त शिवार योजनेचे कोट्यावधी रुपये गेले कुठे?,अजित पवारांचा संतप्त सवाल

मुंबई – जलयुक्त शिवार योजनेचे साडे सात हजार कोटी रुपये गेले कुठे ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.राज्यातील ऐरणीच्या दुष्काळाच्या प्रश्नावर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांनी आणि जनतेची फसवणूक झाल्याचे म्हटले.

नेमकं काय म्हणाले अजित पवार ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, जलयुक्त शिवार योजनेमुळे साडेसोळा हजार गावांना पाणी मिळाले. पण, मोदींचा हा दावा खोटा आहे. सरकारने गाजावाजा करत ही योजना आणली. मात्र, कामे झाली असल्याचे दिसत नाही. मग या योजनेचे साडे सात हजार कोटी गेले कुठे?राज्यात अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती आहे. 1972 हूनही भयंकर दुष्काळ परिस्थिती आज निर्माण झाली आहे. मात्र, सरकार दुष्काळ घोषित करत नाही. सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी.

संपूर्ण जलयुक्त शिवार योजनेचे ऑडिट करा – नवाब मलिक

सुजित मला तुला पारनेरचा आमदार झालेला पहायचं आहे : अजित पवार

माढ्याचं तिकीट मलाच मिळायला हवं!,राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याचा हट्ट