fbpx

मंत्र्यांनी जरा अभ्यास करून बोलावे,अजितदादांचा चंद्रकांतदादांना टोला

टीम महाराष्ट्र देशा- आज मराठा समाजाकडून मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र सरकार पोलीसीबळाचा वापर करून या समाजाच्या कार्यकर्त्यांची धरपड करत आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात भूमिका मांडली.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील मागील आठवड्यात जे बोलत होते तेच आजही बोलत आहेत. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आला आहे, टीसचा अहवाल आला आहे तरी सरकार तो पटलावर का ठेवत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अहवाल पटलावर ठेवा, आम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे, हा आमचा अधिकार आहे, असे ते म्हणाले. आज मराठा समाज मुंबईत मोर्चा काढत आहेत पण सरकार आज कार्यकर्त्यांची धरपकड करत आहे. हे अतिशय शिस्तबद्ध मोर्चे असतात तरी सरकार असं का करत आहे, असे त्यांनी विचारले.

आरक्षणाच्याबाबतीत सरकार जाणीवपूर्वक चालढकल करण्याचा प्रयत्न करत आहे, सरकारला निर्णय घेता येत नाही म्हणून सरकार पळ काढत आहे. चंद्रकांत पाटील म्हणतात मुस्लिम समाजाचे आरक्षण उच्च न्यायालयाने मान्य केले नाही आहे. उच्च न्यायालयाने शिक्षण क्षेत्रात ५ टक्के आरक्षण मान्य केले आहे. मंत्र्यांनी जरा अभ्यास करून बोलावे. भाजप-शिवसेना धर्माच्या आधारे आरक्षणाच्या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले.

हे काय शहाणपणाचं लक्षण नाही ; शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

ते ओरडतच राहिले आणि आम्ही निवडून आलो : चंद्रकांत पाटील