काही झालं तरी सत्ता उलथून टाकण्याचा निर्धार – अजित पवार

20 व्या वर्धापन दिनाला राष्ट्रवादी काँग्रेस करणार जोरदार शक्ती प्रदर्शन, दिग्गज नेत्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष

पुणे: काहीही झालं तरी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार उलथून टाकण्याचा निर्धार करण्यासाठी हल्लाबोल सभेचं आयोजन करण्यात आल्याचे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आज आपला 20 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. याचे औचित्य साधत आज पक्षाचे होमग्राउंड समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेच्या जंगी सांगता सभेच आयोजन करण्यात आलं आहे. स्वतः अजित पवार हे मैदानावर सर्व तयारीचा आढावा घेत आहेत. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

सहकारनगर भागात असणाऱ्या शिंदे हायस्कूलच्या मैदानात ही सभा पार पडणार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या हल्लाबोल यात्रेची सांगता सभा असल्याच सांगतील जात आहे, मात्र. राज्यभरातील नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे जेलमधून सुटका झाल्यानंतर पहिल्यादाच जेष्ठ नेते छगन भुजबळ हे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.