fbpx

आमचं सरकार आल्यावर खेकडयामुळे धरण फुटणार नाही, अजितदादांचे आश्वासन

पुणे : आमचं सरकार आल्यावर खेकडयामुळे धरण फुटणार नाही किंवा एकाही पोलिसांचे अपहरण होणार नाही असं आश्वासन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. मागील काही महिन्यामध्ये सत्ताधारी भाजपच्या मंत्र्याकडून बेताल वक्तव्य केली जात आहेत. हे लक्षात घेता मुंबईतील इमारत दुर्घटने बाबत भाजपचे मंत्री ती इमारत घुशीमुळे पडली असं सांगतील असं वाटले होते. अशा शब्दात भाजप वर त्यांनी निशाणा साधला.

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात अजित पवार हे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, मागील पाच वर्ष भाजप आणि शिवसेना सत्तेमध्ये असून देखील काल शिवसेनेकडून विमा कंपन्याच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. शिवसेना सत्तेमध्ये असताना मोर्चा काढण्याची वेळ त्याच्यावर आल्याची पाहून वाईट वाटले. शेतकर्‍यांच्या विम्याच्या प्रश्नावर मोर्चा काढायचा होता. तर मुंबईत अधिवेशन काळात विधी मंडळावर का नाही काढला. असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.