‘भाजपला सत्तेचा माज, सत्ताधाऱ्यांकडून चौकशीची भीती दाखविली जातेय’

पुणे : भाजप आणि शिवसेनाला सत्तेमध्ये येऊन पाच वर्षाचा कालवधी झाला आहे. मात्र या पाच वर्षात सत्ताधारी भाजपकडून आघाडीतील काही नेत्यांना सत्तेचा वापर करून अनेक प्रकरणाच्या चौकशी लावू अशी भीती दाखविली जाते. नोटिसा बजावल्या जात आहे. यातून भाजपला सत्तेचा माज आला आहे. अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीका केली.

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात अजित पवार हे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, पाश्चिम महाराष्ट्र मुक्त राष्ट्रवादी करणार अशी घोषणा भाजपच्या काही मंत्र्याकडून केली जात आहे. हे लक्षात घेता अशा घोषणा करणार्‍या व्यक्तींना जशाच तसे उत्तर देण्याचे काम करा आणि सर्वांनी एक जीवाने काम करण्याचे असे आव्हान त्यांनी यावेळी केले.