निवडणूक महाराष्ट्राची, नेते गुजरातचे अजित पवार भाजपवर भडकले

blank

कडा : महाराष्ट्रात सुरु असलेल्या विधानसभा निवडणूकीसाठी सत्याधाऱ्यांकडुन गुजरात नेत्यांचा प्रचारासाठी वापर करण्यात येते आहे. त्या नेत्यांना स्थानिक समस्या काय समजणार आहेत. आमच्या काळात आम्ही डान्सबार बंद केले, पण यांच्याकाळात परत छमछम सुरु झाली. उद्योग बंद पडून बेरोजगारी वाढत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

आष्टी येथील राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांच्या प्रचार सभेत मंगळवारी (ता. १५) पवार बोलत होते. उमेदवार बाळासाहेब आजबे, भाजपचे माजी आमदार साहेबराव दरेकर, महेबुब शेख, सतीश शिंदे उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, आम्ही १२ महिन्यांत कारखाना उभारतो. मात्र, भाजप आमदार भिमराव धोंडे ३२ वर्षांपासुन सुतगिरणी उभारत आहेत. गेल्या पाच वर्षात निष्क्रीय असलेल्या सरकारने निवडणूकीच्या तोंडावर दहारुपयात जेवण देण्याची घोषणा केली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सारख्यांवर चौकशा लावल्या जात आहेत असेही अजित पवार म्हणाले. सरकार बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारुन शकत नाही, तर महापुरुषांचे स्मारक कसे उभारणार असा सवाल करत मतदारांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे काय झाले याचा जाब सरकारला विचारावा असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, भाजपचे माजी आमदार साहेबराव दरेकर यांनीही अजित पवारांच्या सभेला हजेरी लावली. भाषणात राष्ट्रवादीचे आजबे यांना साथ देणार असल्याचे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या