fbpx

शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या तर ते पाप फडणवीस सरकारचं

टीम महाराष्ट्र देशा : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या तर ते पाप फडणवीस सरकारचं असेल, अशी टीका अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

ज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरवात झाली आहे. हे अधिवेशन राज्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अधिवेशनावेळी चांगलीच खडा जंगी होणार असल्याच दिसत आहे. मात्र आज अधिवेशनाच्या सुरवातीलाच विरोधकांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

याचदरम्यान, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. दुष्काळग्रस्त बळीराजाला कर्जामाफी तर सोडाच परंतू पुनर्गठीत कर्जावर १० ते १२ टक्के व्याज आकारून सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या तर ते पाप फडणवीस सरकारचं असेल, अशी टीका अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

इतकेच नव्हे तर, सहा महिन्यांपूर्वी १९१ तालुके दुष्काऴग्रस्त होते पण सरकारने चारा छावण्या एप्रिलमध्ये सुरू केल्या, असा आरोपही पवार यांनी केला.