‘भाजपची गल्ली पासून दिल्लीत सत्ता, मग इतर पक्षातील लोक कशाला हवीत’

टीम महाराष्ट्र देशा :विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आघाडीचे पुणे शहरातील जागावाटप जाहीर झाले आहे. यासंबंधीची घोषणा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. पुणे शहरातील 8 पैकी राष्ट्रवादी काँग्रेस 4, काँग्रेस 3 तर एक जागा मित्रपक्ष लढवणार आहे अशी माहिती अजित पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्यात दिली आहे.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. त्यांनी राज्यात जेव्हा पूरस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा हे यात्रा काढत होते. गेल्या तीन महिन्यात सरकारने 350 शासन निर्णय काढले. याआधी सरकार झोपलं होतं का? असा प्रश्नही पवारांनी उपस्थिती केला. भाजप सरकारला सत्तेची नशा चढली आहे असा आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.

पुढे बोलताना पवार यांनी ‘भाजपची गल्ली पासून दिल्लीत सत्ता आहे मग इतर पक्षातील लोक कशाला हवीत. अनेक ठिकाणी शिवसेनेची जागा असताना अनेकजण भाजपत गेलेत. त्यामुळे पक्षातील लोकांना उमेदवारी देणार का नाही असा प्रश्नच उपस्थित झाला आहे. तसेच जोपर्यंत भाजप उमेदवार जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही उमेदवार जाहीर करणार नाहीत असं पवार म्हणाले आहेत.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी सद्यस्थितीत शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. सध्याच्या सरकारने ठरवलेले शैक्षणिक धोरण चुकीचं आहे, त्यामुळे कोणाचाही विकास झालेला नाही. शेतकरी, कामगार यांची फसवणूक झाली. सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहेत. ज्यांना महागाईचा फटका बसला आहे, त्यांनी पेटून उठावे असंही अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या