fbpx

बाकीचेचं कॅबिनेट मंत्री होतायत, तुम्ही निष्टावंत मागे रहातायं – अजित पवारांचा टोला

टीम महाराष्ट्र देशा : रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागली, दरम्यान, विखे पाटील यांना मंत्रिपद दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप- सेनेच्या निष्टावंत नेत्यांना टोला लगावला आहे.

पावसाळी अधिवेशनाला आज सुरवात झाली. दरम्यान, काल राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळाच्या विस्तारात कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद देण्यात आले. विखे यांना गृहखात्याची जबाबदारी देण्यात आली.

दरम्यान, आजच्या पावसाळी अधिवेशनात अजित पवार यांनी विखेंच्या मंत्रीपदावरून कोणत्याही सभागृहाचे सभासद नसताना नेते मंत्रिपदाची शपथ कशी घेतात? असा सवाल केला, त्यावेळी सेना- भाजपच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात येत होत्या. त्यावेळी, निष्ठावंतांना बाजूला ठेवले आहे, बाकीचेचं कॅबिनेट मंत्री होत आहेत, तुम्ही निष्टावंत मागे रहा, असा टोला अजित पवार यांनी लगावला.