चले जाव चळवळ म.फुलेंनी सुरु केली, अजित पवार यांचा ‘जावईशोध’

ajit pawar

पुणे- ‘चले जाव’ चळवळ महात्मा फुले यांनी उभी केली, असे विधान अजित पवारांनी केले. महात्मा गांधी यांच्याऐवजी अनवधानाने अजित पवारांनी महात्मा फुले असा उल्लेख केला. मात्र, त्यांची ही चूक सोशल मीडियावरील युजर्सच्या नजरेतून सुटली नाही आणि पवारांचा ‘जावईशोध’ असे म्हणतं हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. भाजपा नेत्या आणि लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या विधानाचा संदर्भ देताना ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

मेंदूला सारखं सांगतो, कुठलाच चुकीचा शब्द जाऊ देऊ नकोस : अजित पवार

नेमकं काय म्हणाले अजित पवार ?
चले जाव चळवळीमुळे ब्रिटीश भारतातून गेले नाहीत, असे भाजपाचे ज्येष्ठ नेत्यांनी अश्या प्रकारची वल्गना केली. म्हणजे इथे महात्मा फुल्यांनी चले जाव ची चळवळ उभा केली.तश्या पद्धतीने एक आव्हान केलं.अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि लोकसभा अध्यक्ष असलेल्या सुमित्रा महाजन असे विधान करतात. भाजपाकडून वारंवार असे विधान केले जात आहे. अशाप्रकारची वक्तव्ये करणाऱ्यांच्या मागील बोलवता धनी कोण, हे शोधून काढायला हवे. मनुवादी प्रवृत्ती या देशाला कदापि पुढे घेऊन जाऊ शकत नाही. ही अतिशय चुकीची प्रवृत्ती आहे.

राजकीय टोलेबाजी करणारे अजित पवारांचे विटी-दांडू खेळतांना टोले फसले

दरम्यान, अजित पवारांचा हा व्हिडीओ फेसबूकवर व्हायरल झाला आहे. नेटक-यांकडून त्यांच्या या विधानाची खिल्ली उडवताना अजित पवारांना देशाचा इतिहासच माहित नसल्याची टिका करण्यात येत आहे.

पहा व्हिडीओ 

दीडपट हमीभाव म्हणजे भाजपचा चुनावी जुमला – अजित पवार

हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र यावं, मग बघू…- अजित पवार