fbpx

हयात संभाव्य उमेदवाराला अजितदादांनी केल मयत !

टीम महाराष्ट्र देशा : पाथर्डी येथे झालेल्या निर्धार परिवर्तन सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील संभाव्य उमेदवार प्रतापकाका ढाकणे हे हयात नासल्याचं अत्यंत हास्यास्पद विधान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. एवढ्यावरच थांबतील तर ते दादा कसले अजितदादांने याच्याही पुढे जात प्रतापकाका यांचे वडील आणि माजी मंत्री बबनराव ढाकणे हे देखील हायत नसल्याचं धक्कादायक विधान केले आहे. अजित पवार यांच्या या विधानाची आता नगर जिल्ह्यातील राजकारणात खमंग चर्चा सुरू आहे.

दरम्यान, पुढे जात “मला राजीव राजळे आणि मारुतराव घुले हयात नाहीत असं म्हणायचं होत” असे सांगत सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र अजित दादांच्या हा कृतीने जरी उपस्थितांमध्ये हास्य उडाले असले तरी आपले संभाव्य उमेदवार हयात आहेत की नाही याची माहिती एका जबाबदार नेत्याला नसणे हे खरच नवल वाटण्यासारखं आहे.