fbpx

बारामतीकरांच्या कामामुळे आणि पत्नीच्या जाचाने केस गेले-अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा: आपल्या रांगड्या भाषाशैलीसाठी प्रसिद्ध असलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खास भाषेने ते नेहमी सभा जिंकण्यात पटाईत आहेत. बारामतीत जिजामाता भवनात राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात अजित पवार यांनी फारसा फेटा न बांधण्याचं कारण त्यांच्या याच खास रांगड्या शैलीत सांगितल आहे.

‘मी तर कधी फेटा बांधत नाही तुम्हाला माहित आहे. पण तुम्ही फेटा बांधल्यावर मलाही राहवलं नाही, म्हटलं बांध बाबा, आता काय करु? कारण फेटा बांधायला आता केस पण राहिले नाहीत की काय, सगळे केस गेले, तुमच्यासाठी काम करता करता माझे केस पण गेले. सुनेत्राला म्हणत असतो आता माझे केस बारामतीकरांकरता गेले, का तुझ्यामुळे गेले बघ आता. गमतीचा भाग जाऊद्या’ अस म्हणताच उपस्थिततांमध्ये एकच हशा पिकला