पहिलं ‘कोरोना’बाधित दाम्पत्य ‘कोरोना’मुक्त; अजित पवारांकडून उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभार

मुंबई : महाराष्ट्र करोनाच्या तिसर्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामळेच कोरोना व्हायरसचा होणारा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारदेखील प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील पहिले दोन कोरोनाबाधित रुग्ण म्हणून उपचार घेत असलेले पुण्यातील दोन जण बुधवारी ‘कोरोना’मुक्त होऊन घरी परतले आहेत.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या रुग्णांवर आणि राज्यातील विविध रुग्णालयात ‘कोरोना’बाधितांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहे.

Loading...

याबाबत त्यांनी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. ‘जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात येईल, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

दरम्यान, राज्यात संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्याची कुठलीही टंचाई नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सरकार सर्वकाळ नियमित राहिल,’ असं आवाहन त्यांनी दिलं.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
१५ एप्रिलनंतर खऱ्या अर्थाने कोरोनाशी लढा सुरु होणार आहे : नरेंद्र मोदी
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश