fbpx

‘दक्षिण नगरच्या जागेचा आणि पुण्याच्या जागेचा काहीही संबंध नाही’

टीम महाराष्ट्र देशा – गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण नगरच्या जागेसाठी राष्ट्रावादी आणि कॉंग्रेसमध्ये वाद चालू आहे. दक्षिण नगरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसची आहे आणि पुढेही ती राष्ट्रवादीकडेच राहणार आहे. तसेच पुण्याच्या जागेचा आणि दक्षिण नगरच्या जागेचा काहीही संबंध नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले आहे.

येत्या 8 मार्चपर्यंत महाआघाडीचे जागावाटप जाहीर होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. वारजे येथे पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी ही माहिती दिली.

अजित पवार यांनी यावेळी सरकारवरही टीका केली. धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्री गंभीर नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे.धनगर आरक्षण द्यायचे होते तर मग गेल्या साडेचार वर्षात का दिलं गेलं नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर वेळ मारुन नेण्याचं काम चालू असल्याचं ते म्हणाले.