‘ज्यांना महागाईचा फटका बसलाय त्यांनी पेटून उठा’

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आघाडीचे पुणे शहरातील जागावाटप जाहीर झाले आहे. यासंबंधीची घोषणा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. पुणे शहरातील 8 पैकी राष्ट्रवादी काँग्रेस 4, काँग्रेस 3 तर एक जागा मित्रपक्ष लढवणार आहे अशी माहिती अजित पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्यात दिली आहे.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी ‘गेल्या काही दिवसांपासून आघाडी संदर्भात समविचारी असून जागावाटपाची चर्चा सुरु आहे. मतदानासाठी अवघा एक महिना उरला आहेत. त्यामुळे आपल्याला एक महिना जीवतोड मेहनत करावी लागणार आहे. आपल्या हातात एकच महिना आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी प्रचारात झोकून द्या असे आवाहनही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

तसेच सद्यस्थितीत शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. सध्याच्या सरकारने ठरवलेले शैक्षणिक धोरण चुकीचं आहे, त्यामुळे कोणाचाही विकास झालेला नाही. शेतकरी, कामगार यांची फसवणूक झाली. सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहेत. ज्यांना महागाईचा फटका बसला आहे, त्यांनी पेटून उठावे असंही अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, पुढे बोलताना त्यांनी ‘बारामतीसह अनेक ठिकाणी टँकर सुरु आहे. तसेच चारा छावण्याही सुरु आहे. पुण्यात पाणी टंचाई आहे. मी पालकमंत्री असताना पुण्यात कधीही पाणी टंचाई जाणवू दिली नाही. त्यामुळे हे या सरकारचे अपयश आहे असंही अजित पवार यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...

Loading...

Loading...