संभाजी पाटील निलंगेकर हे सरकारचे जावई आहेत का ? – अजित पवार

अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा : कर्ज माफ झालेले संभाजी पाटील निलंगेकर हे सरकारचे जावई आहेत का? असा खडा सवाल सवाल माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी विचारला आहे

तर केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार येऊन चार वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. या संपूर्ण कालावधीत सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी चिक्की ते उंदीर घोटाळे करण्यावर भर दिला आहे. त्या घोटाळ्याचे पुढे काही झालं नाही. असं म्हणत अजित पवार यांनी सरकारचा समाचार घेतला आहे.

दरम्यान, राज्याचे कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर मेहरबानी दाखवत दोन बँकांनी त्यांचे तब्बल 51 कोटी 40 लाख रुपये माफ केले आहे.