उदयनराजे म्हणाले लोकप्रतिनिधींना गाडा, आता अजितदादा म्हणतात….

ajit pawar - udayanraje

पुणे : खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजी छत्रपती यांची बहुप्रतिक्षीत भेट काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांच्या आधीच ठरलेल्या काही कार्यक्रमांमुळे होऊ शकली नव्हती. त्यामुळे राज्यभरात उलट-सुलट चर्चांना उधान आले होते. मात्र, काल ( १४ जून ) पुण्यात हे दोन्ही राजे यांच्यात बैठक झाली. या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले होते.

या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खा. उदयनराजे यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर चालढकल करणाऱ्या राजकीय नेत्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. ‘माझा पाठिंबा संभाजीराजेंना आहे. मराठ्यांना आरक्षण हे एकच ध्येय आहे. राज्यकर्त्यांना फार मुभा दिली. निवडून आलं म्हणजे आपलं सगळं असं समजू नका. लोकशाहीचे हे राजे आहेत, त्यांना जाब विचारला पाहिजे. माझं ठाम मत आहे, आडवा आणि गाडा, जाब विचारा.. सुरुवात माझ्यापासून करा. आमच्या वाड्यावर येऊन विचारा… माझ्याप्रमाणे सर्वांना विचारा.. खरं खोटं करा.. किती काळ संभ्रमावस्थेत ठेवणार, असा संताप उदयनराजे यांनी व्यक्त केला आहे.

उदयनराजे यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजेंनी लोकप्रतिनिधींना अडवून गाडण्याची भूमिका घेतल्यासंबंधी जेव्हा अजित पवारांना विचारण्यात आले तेव्हा अजित पवारांनी सगळेच लोकप्रतिनिधी ना अशी विचारणा करत बोलणारेही लोकप्रतिनिधी असा टोला उदयनराजे यांना लगावला आहे.

दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी ६ जूनला रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे. मराठा समाजच्या मागण्यांवर विचार नाही झाला तर पुण्यातून मंत्रालयावर लॉंगमार्च काढण्याचा थेट इशारा देखील खा. संभाजीराजे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बताया 

IMP