‘जनता आता दूधखुळी नाही, भाजप आणि शिवसेनेला मतदार जागा दाखवतील’- अजित पवार

कराड: ‘शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. एकीकडे सत्तेत बसायचं, दुसरीकडे विरोध करायचा आणि लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा. पण जनता काही ऐवढी दूधखुळी नाही. जनतेला काही समजत नाही असं काही समजण्याचं अजिबात कारण नाही. महाराष्ट्रातील जनता प्रचंड हुशार आहे.

आम्ही कसं वागतो, काय बोलतो याकडे अतिशय बारकाईनं लक्ष देतात. त्यामुळे निवडणुकीत कुठं बटण दाबायचं तिथं ते बरोबर दाबतात. शिवसेनेला सत्तेची ऊबही हवी आहे आणि विरोधकांची स्पेस देखील. सगळंच आधाशासारखं घेण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे.’ अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या ३३व्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार यांनी स्मृतीस्थळाच दर्शन घेतलं त्यावेळी अजित पवार बोलत होते.

You might also like
Comments
Loading...