Share

Ajit Pawar | राष्ट्रवादी नेत्यांच्या ‘त्या’ भाकितानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Ajit Pawar | मुंबई : आजपासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसीय मंथन शिबीर सुरू होत आहे. हे शिबीर सुरू होण्याआधीच जयंत पाटील यांनी एक वक्तव्य केलं. आमचं अधिवेशन झाल्यानंतर, राज्यातील सध्याचं शिंदे-फडणवीस सरकार पडेल, असं पाटलांनी म्हटलं. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अशातच यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते तशा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही भाष्य केलं आहे.

काय म्हणाले अजित पवार (Ajit Pawar)

अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वर्तवलेल्या भाकिताबाबत विचारण्यात आले. तेव्हा याबाबत त्यांनाच विचारा, असं प्रत्युत्तर देत. “त्यांचं मत त्यांना लखलाभ”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

तसेच, सरकारच्या स्थिरतेबाबत अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. जोपर्यंत 145 आमदार एकनाथ शिंदेंच्या पाठिशी आहेत, तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्यादिवशी हा आकडा कमी होईल, त्या दिवशी हे सरकार जाईल, असं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, जयंत पाटलांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही भाष्य केलं आहे. सध्याच्या सरकारबद्दल शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड रोष आहे. आज कार्तिकी एकादशी आहे. आषाढी आणि कार्तिकीची महापूजा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतात. पण येणाऱ्या आषाढीची शासकीय महापूजा महाविकास आघाडीचेच मुख्यमंत्री करतील. आम्हाला विश्वास आहे की 100 च्यावर आमदार आम्ही निवडून आणू. आगामी काळात राष्ट्रवादीचेच मुख्यमंत्री महाराष्ट्रात दिसतील, असं मिटकरीनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | मुंबई : आजपासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसीय मंथन शिबीर सुरू होत आहे. हे शिबीर सुरू होण्याआधीच …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now