VIDEO: पंकजा मुंडेंच्या मतदारसंघातच अजित पवारांचा पंकजा मुंडेंवर ‘हल्लाबोल’

पालकमंत्रीपद कुणाकडेही असले तरी बीडचा विकास करण्याची धमक फक्त धनंजय मुंडेंकडेच-अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या हल्लाबोल यात्रेदरम्यान पाचव्या दिवशीची जाहीर सभा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदारसंघात झाली यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंकजा मुंडे याचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. “बीडचे पालकमंत्रीपद कुणाकडेही असले तरी बीडचा विकास करण्याची धमक फक्त धनंजय मुंडे यांच्याकडेच आहे.” अस म्हणत अजित पवार यांनी पंकजा मुंडेंच्या कारभारावर जोरदार टीका केली.

मुख्यमंत्र्यांना जे हवंय तेच करायची सवय लागली आहे. धनंजय मुंडे यांनी सभागृहात २२ मंत्र्यांचा घोटाळा बाहेर काढला. पण त्यांना जो नको होता तोच मंत्री चौकशीसाठी बाहेर काढला बाकीच्यांना मुख्यमंत्र्यांनी क्लिन चीट देऊन टाकली. मोपलवार सारख्या अधिकाऱ्याची तर वेळेत चौकशी पूर्ण करुन त्याला पुन्हा त्याच पदावर रुजुही केले. कारण त्यांना मोपलवारच समृध्दी महामार्गाच्या प्रकल्पात हवे होते. अशी टीका अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला.

यावेळी बीड जिल्ह्यात परळी सोडून सर्व ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार निवडून आल्याची आठवण सांगत यावेळी परळीसहित सर्व जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार निवडून देण्याच आवाहन अजित पवार यांनी केल.

पहा काय म्हणाले अजित पवार