नाना पटोलेंना मुख्यमंत्री व्हायचंय, अजित पवार म्हणतात…

shahu maharaj - ajit pawar (1)

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे वारंवार समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचा उल्लेख केला होता.

हे सर्व सुरु असताना शिवसेना-राष्ट्रवादी हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आगामी काळातील सर्व निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढणार असे छातीठोकपणे सांगत आहेत. आता नाना पटोले यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर लक्ष असल्याचं समोर आलंय. आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री बनायचे असल्याची इच्छा नाना पटोले यांनी बोलून दाखवली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच मुख्यमंत्रिपदाबाबतची महत्वाकांक्षा जाहीरपणे व्यक्त केली होती. तसेच काँग्रेस आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचीही घोषणा पटोलेंनी केली. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आपला पक्ष वाढावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली असेल तर स्वप्न पाहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. उद्या तुम्हालाही रिपोर्टरपदावरुन चिफ एडिटर केलं तर आवडणार नाही का? प्रत्येकाला महत्वाकांक्षा असते. पण शेवटी पक्षाचे प्रमुख म्हणून जे व्यक्ती आहेत. ते निर्णय घेत असतात. आता कोणत्या पक्षाशी आघाडी करायची की स्वबळावर लढायचं हा अधिकारा काँग्रेसमध्ये सोनिया गांधी यांना आहे. राष्ट्रवादीत शरद पवार आणि शिवसेनेत उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे आम्ही यावर मत व्यक्त करणं योग्य नाही’, असं अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

IMP