डुक्कर वाढली आहेत त्यामुळे शेताचे नुकसान होतं या गड्याला अजून एक पिस्तुल द्या-अजित पवार

नागपूर: गिरीश महाजन हा गडी वस्ताद आहे. जो माणूस हातात बंदूक घेऊन बिबट्या शोधू शकतो त्याला डुक्कर “किस झाड की पत्ती है. हल्ली डुक्कर वाढली आहेत त्यामुळे शेताचे नुकसान होत आहे. या गड्याला अजून एक पिस्तुल द्या त्यामुळे शेतीचे तरी नुकसान होणार नाही”. असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा मात्री गिरीश महाजन यांना लगावला आहे. सभागृहात बोलताना अजित पवार यांनी गिरीश महाजन यांची अॅक्टिंग करत सभागृहात एकच हशा पिकवला.

दरम्यान, मध्यंतरी नुकताच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा हातात बंदूक घेऊन बिबट्या शोधात असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे महाजन यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती