Share

Ajit Pawar | “मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला समोरुन प्रतिसाद मिळत नव्हता, पण उद्धव ठाकरेंच्या मिळत होता”

कोल्हापूर : शिवसेनेचा दसरा मेळावा बुधवारी पार पडला. मात्र यावर्षी शिवसेनेचे दोन मेळावे झाले. एक एकनाथ शिंदे यांचा आणि दुसरा उद्धव ठाकरे यांचा. शिंदेंचा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडला. तर ठाकरेंचा शिवाजी पार्कवर. या मेळाव्या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले अजित पवार ?

दसरा मेळाव्यामधील एकनाथ शिंदे यांचे भाषण एक तास 24 मिनिटं झालं. शेवटी लोक उठून जायला लागल्यामुळे थांबावं लागलं. नाहीतर किती तास केलं असतं कुणाला माहिती. कारण पहिल्यांदात इतकी लोक दिसली म्हणून बळच भाषण. मला टीका करायची नाही पण वस्तूस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला समोरुन प्रतिसाद मिळत नव्हता. पण उद्धव ठाकरेंच्या भाषणाला प्रतिसाद मिळत होता, असं म्हणत अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला केला आहे. अजित पवार यांनी काल कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली होती. त्यावेळी भाषण करताना ते त्याठिकाणी बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, अजित पवार सत्ता गेली म्हणून ओरडतोय असं वाटेल. पण तसं नाहीय. सत्ता येते, सत्ता जाते. आम्ही सत्तेसाठी हापहापलेले नाही आहोत. जी जबाबदारी जनता देईल ती आम्ही पार पाडू. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तिथं भाषण करत असताना सारखं ही लोक बसलेली आहेत ती आपणहून आली आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणत होते. अरे निम्मी तर तुमच्या भाषणात निघून गेली. मग कशी आपणहून आली? खुर्चा मोकळ्या झाल्या. आपणहून आलेल्या लोकांनी खुर्च्या मोकळ्या का केल्या? असे प्रश्न अजित पवार यांनी याठिकाणी उपस्थित केले आहेत.

त्याचप्रमाणे, काहींना टीव्हीवाल्यांनी विचारलं कशाला आलात? त्यावर कशाला आलोय कुणाला माहिती. चहा नाही, पाणी नाही, जेवण नाही, काहीच नाही असं ते लोक सांगत असल्याचंही अजित पवारांनी म्हटलं. तसेच, मेळाव्यातील शिंदेंच भाषण वाचूनच सुरु होतं. असं नाही चालत. शिंदेसाहेब हा महाराष्ट्र आहे. देशातील एक प्रगत राज्य आहे. असं असताना तुम्ही महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून उद्या कोणत्या दिशेने नेणार आहात ते सांगायला हवं होत, असंही पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

कोल्हापूर : शिवसेनेचा दसरा मेळावा बुधवारी पार पडला. मात्र यावर्षी शिवसेनेचे दोन मेळावे झाले. एक एकनाथ शिंदे यांचा आणि दुसरा उद्धव …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now