Share

Ajit Pawar | “…तर या ही बाबाला घरी जावं लागेल”; अजित पवारांचा एकनाथ शिंदेंवर हल्ला

कोल्हापूर : बुधवारी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडला. शिंदेंचा बीकेसी मैदानावर होता, तर ठाकरेंचा शिवाजी पार्कवर. दोघांनीही आप-आपल्या भाषणात एकमेकांवर टीका, टिप्पणी केली. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांनी मेळाव्यात केलेल्या भाषणावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले अजित पवार ?

मेळाव्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वाचून भाषण सुरु होतं. असं नाही चालत. शिंदेसाहेब हा महाराष्ट्र आहे. देशातील एक प्रगत राज्य आहे. असं असताना तुम्ही महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून उद्या कोणत्या दिशेने नेणार आहात ते सांगायला हवं होतं, असं म्हणत अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला केला आहे.काल कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी भाषण करताना ते त्याठिकाणी बोलत होते.

सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला 50 कोटीची कामं दिली तर विरोधी पक्षाच्या आमदाराला 25 कोटीची तरी कामं दिली पाहिजेत. या असल्या गोष्टी कोणी करायला लागलं तर कुणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही हे लक्षात ठेवावं. एकनाथ शिंदे पण कायमचे तिथे बसायला नाही आले. उद्या 145 चा आकडा बाजूला गेला तर या ही बाबाला घरी जावं लागेल. कुठेतरी अंतर्गमुख होऊन त्यांनी विचार केला पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

तसेच, 10 कोटी रुपये तुम्ही एसटीला भरता. कुठून आले हे 10 कोटी रुपये? तुम्ही गावच्या एसटी तिकडे आणल्यात.त्यामुळे ग्रामीण भागात एसटी रद्द कराव्या लागल्या. त्याठिकाणच्या लोकांना एसटी मिळाल्या नाहीत त्या दिवशी. यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झालात का?,असा सवालही अजित पवार यांनी शिंदे यांना केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

कोल्हापूर : बुधवारी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडला. शिंदेंचा बीकेसी मैदानावर होता, तर ठाकरेंचा शिवाजी पार्कवर. …

पुढे वाचा

Kolhapur Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now