खडसेंनी जे कानात सांगितलं ते तुम्हाला सांगणार नाही – अजित पवार

एकनाथ खडसे आणि अजित पवार यांच्या कानगोष्टींचा 'सस्पेन्स' कायम

जळगाव : राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच वक्तव्य करून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यात जळगाव येथे डॉ. सतिश पाटील यांच्या सर्वपक्षीय सत्कार कार्यक्रमात अजित पवार आणि एकनाथ खडसे एकाच मंचावर असल्याने सगळ्या राज्याचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले होते.

या कार्यक्रमात माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा सगळेकडे सुरु आहेत पण नाथाभाऊंच्या मनात काय आहे हे कोणास ठाऊक असा सवाल केला यावर उत्तर देताना माझ्या मनात काय आहे ते मी अजित दादांना कानात सांगितलं आहे असं वक्तव्य केलं.

आता अजित पवार यांच्या कानात एकनाथ खडसेंनी काय सांगितल याची उत्सुकता लागली होती. पण खडसेंनी आपल्याला जे कानात सांगितलं ते आपण तुम्हाला सांगणार नाही असं सांगत संशय कायम ठेवला. तर या आपल्या वक्तव्यामुळे भाजपच्या नेत्यांना झोप येणार नाही असंही अजित पवार म्हणाले. त्यामुळे खडसे आणि अजित पवारांच्या कानगोष्टींचा सस्पेन्स महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही कायम आहे.

You might also like
Comments
Loading...