पक्षाविरोधात बोलाल तर खबरदार; अजित पवारांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना सुनावले

पुणे: पक्षात कोणावर अन्याय होत असेल तर त्याची दाखल घेतली जाईल, मात्र भर सभागृहात पक्ष विरोधी बोलणे खपवून घेतले जाणार नाही म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील पदाधिकारी आणि नगरसेवकांना सुनावले आहे. काल पुणे महापालिकेच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस नगरसेविका आरती बाबर यांनी भर सभेत पक्षातील नेत्यांवर सडकून टीका केली होती, त्यानंतर अजित पवार यांनी सर्वाना तंबी दिली आहे.

पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेस नगरसेविका आरती बाबर यांनी भर सभागृहात स्वपक्षातील नेत्यांवरच हल्लाबोल केला होता. पक्षातील वरिष्ठ नेते कुरघोडीचे राजकरण करत असल्याचा आरोप बाबर यांनी यावेळी केला, तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभासदत्वाचा राजीनामाही देवून टाकला होता. भर सभागृहात आपल्याच नगरसेविकेकडून नेत्यांचे वाभाडे काढण्यात आल्याने विरोधी पक्ष नेत्यांसह इतर नगरसेवकांची भंबेरी उडाली होती.

दरम्यान, मंगळवारी झालेली पक्षीय आढावा बैठकीत अजित पवार यांनी आरती बाबर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना सुनावले आहे. तसेच बाबर यांनी हे पाउल नेमक का उचलले यांची करणेही मागवली आहेत.

You might also like
Comments
Loading...