मंत्र्यांनाच सरकारवर भरवसा राहिला नाही – अजित पवार

ajit

सातारा: ‘शेतक-यांबाबतीत सरकारची भूमिका दुटप्पीपणाची आहे. शेतक-यांनी आधुनिकतेची कास धरली असली तरी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हमीभाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सरकारने कर्जमाफीबाबत शेतक-यांच्या भावनेशी खेळल्याने मंत्र्यांनाच सरकारवर भरवसा राहिला नाही,’ अशी घणाघाती टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

Loading...

शिरवळ येथील राज्यस्तरीय कृषी व पशुप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. नितीन भरगुडे-पाटील यांनी प्रास्ताविकात सत्कारमुर्तींची मोठी यादी झाल्याने अजित पवार यांनी हसत जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या पराभवामुळे नितीन भरगुडे-पाटील यांचा जोरदार चिमटा काढला. ‘यावेळी नितीन नुसते लोकांचे सत्कार नको करत बसू. लोक तुला पाडतात,’ असे अजित पवार म्हणताच कार्यक्रमस्थळी हशा पिकला.Loading…


Loading…

Loading...